( ३१४) नवप्रतिवासुदेव व्रतकथा.
( ३१४) नवप्रतिवासुदेव व्रतकथा. व्रतविधि – पौष शु. ७ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं एकभुक्ति करावी. आणि ८ दिवशीं प्रातःकाळीं शुचिजलाने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधीतवर्षे धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात श्रीजिनेंद्रास मक्तीने साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप अष्टद्रव्ये ठेवावीत. मग अष्टके, स्तोत्रे, जयमाला…