( ६७) समाधिविधानव्रतकथा.
समाधिविधानव्रतकथा. व्रतविधि-वैषाख शु. ८ दिवशीं प्रातःकाळीं या व्रतिकांनीं उष्णपाण्याने अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे घ्यावींत, सर्व पूजासामग्री हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यायथशुद्धिपूर्वक जिनेंद्रास साष्टांग नमस्कार करावा. पीठावर पंचपरमेष्ठीची प्रतिमा स्थापून तिचा पंचामृतांनीं अभिषेक करावा. देवापुढें शुद्धभूमीवर पंचवणौनीं अष्टदलकमल यंत्र काढावें, मध्ये अक्षता घालून हीं अक्षरयुक्त स्वस्तिक काढून त्यावर एक सुशोभित कुंभ…