( ३०४) दारिद्याविनाशक व्रतकथा.
( ३०४) दारिद्याविनाशक व्रतकथा. व्रतविधि- आश्विन शुक्लपक्षांतील प्रथम गुरुवारी या व्रतिकांनी एकभुक्ति करावी. आणि शुक्रवारी प्रातःकाळीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौतत्रस्खें धारण करात्रींत. नंतर सर्व पूजा सामग्री आपल्या बरोबर घेऊन जिनमंदिरास जावं. तेथे गेल्यावर चैत्यालयांस तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया कराव्यात. श्रीजिनेंद्रास भक्तीने साष्टांग प्रणाम करावा. श्रीपीठावर पंचपरमेष्ठो प्रतिमा यक्ष यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनीं…