(६५) अथ सिद्धव्रतकथा.
सिद्धव्रतकथा. व्रतविधि – श्रावणमासाच्या शुक्त पक्षांतील पहिल्या आदि- त्यवारी (रविवारी) प्रातःकाळीं या व्रतिकांनी अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ धौतवस्ने धारण करावींत, सर्व पूजासादित्य बरोबर घेऊन चैत्यालयास जावे. मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धिपूर्वक जिनांस मक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत सिद्धप्रतिमा व रत्नत्रयजिनप्रतिमा स्थापून त्यांचा पंचामृडांनी मत्रपूर्वक अभिषेक कररावा. अष्टद्रव्यांनीं रत्नत्रयजिनांची (अरनाथ, मछिनाथ, मुनिसुन्नत यांची) आणि सिद्धपरमेष्ठींचो अर्चना…