२१. मोक्षलक्ष्मीनिवास व्रतकथा.
मोक्षलक्ष्मीनिवास व्रतकथा. व्रतविधि-आषाढ महिन्यांतील नंदीश्वर पर्वांत शुद्ध ८ दिवशीं या व्रत ग्राहकांनीं शुद्धोदकांनें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वस्त्र धारण करावीत. सर्व पूजा द्रव्यें हातीं घेऊन जिनालयास जावें. मंदि- रास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रिया करून जिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठावर चंद्रप्रभ तीर्थकर प्रतिमा अजित यक्ष ज्वालामालिनी यक्षीसह स्थापून त्यांचा पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनीं…