३०. कल्याणतिलक व्रतकथा.
कल्याणतिलक व्रतकथा. व्रतविधि – फाल्गुन शु. ८ ते १५ पर्यंत आठ दिवस या व्रत-धारकांनी प्रातःकाळी सुखोष्ण जलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौत वखें धारण करावीत. मग सर्व पूजासामग्री इातीं घेऊन जिना- लयास जावे. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा वाळून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियापूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदा- दीप लावावा, श्रीपीठावर नंदीश्वरबिंय आणि चोवीस तीर्थकर…