(५४) चक्रवाळव्रतकथा.
चक्रवाळव्रतकथा. व्रतविधि – फाल्गुन मासांत उत्तराफाल्गुनी नक्षत्र ज्या तिथीस पूर्ण असेल त्या तिथीस या व्रतधारकांनीं शुचिजलानें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढधौत वर्षे धारण करावीत, मग सर्व पूजासामग्री आपल्या करी घेऊन जिनालयास जावें. तेथे गेल्यावर मंदिरास तीन प्रदक्षिणा घालून ईर्यापथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रांस भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. नंदादीप लावावा. श्रीपीठावर श्रीआदिनाथ तीर्थकर प्रतिमा गोमुखचक्रेश्वरीयक्षयक्षीसहित स्थापून त्यांचा पंचामृतांनीं…