(४७) आदित्यवारव्रतकथा
आदित्यवारव्रतकथा व्रतविधि – आषाढ मासीं शुक्लपक्षाच्या शेवटच्या रविवारी या व्रतधारकांनीं प्रातःकाळीं उष्णोदकांनें अभ्यंगस्नान करून अंगावर दृढ- धौतवस्खें धारण करावींत. सर्व पूजासाहित्य बरोबर घेऊन जिनालयास जावें. मंदिरास तीन प्रदक्षिणा देऊन ईयपथशुद्धि वगैरे क्रियांपूर्वक श्रीजिनेंद्रास भक्तीनें साष्टांग नमस्कार करावा. पीठांत पार्श्वनाथ तीर्थ- कर प्रतिमा धरणेद्रयक्ष पद्मावती यक्षीसह स्थापून पंचामृतांनी अभिषेक करावा. अष्टद्रव्यांनी त्यांची अर्चना करावी. श्रुत व…